रमजान ईद हार्दिक शुभेच्छा

रमजान महिन्यातील रोजे संपल्यावर ईद येते.. ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव, ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करतात व एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची भेट घेऊन शुभेच्छा देतात.. प्रेषित हजरत मोहमद पैगम्बर यांनी, आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला आहे.. या संदेशाचे स्मरण करावयाचे हे महान पर्व आहे रमजान ईद निमित्ताने माझ्या सर्व भारतीय मुस्लिम बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा… ईद मुबारक!