Birthday Wishes for Sasu in Marathi
सासू माझी भासे मला, माझ्या आई सारखी,
कधी केला ना दुरावा, देते मायेची सावली..
करी सर्वांचा विचार, गुण आहेत महान,
कधी चूक झाली काही, तरी घेतले समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सासू तुम्हासारखी,
जन्मोजन्मी होईन मी, सून तुमच्या घरची…
आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
माझी प्रेमळ सासू..
Birthday Wishes for Sun in Marathi
सून माझी भासे मला, माझ्या मुली सारखी,
कधी केला ना दुरावा, घेते काळजी वेळोवेळी..
करी सर्वांचा आदर, गुण आहेत महान,
कधी रागावले कुणी, तरी घेते समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सून तुझ्यासारखी,
जन्मोजन्मी हवी सून तूच माझ्या घरची…
सुनबाई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो..
माझी प्रेमळ सुन..