Sukhi Jeevnachi Gurukilli

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे, पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल असे बोलू नये…

Jeevan Ek Ganit Aahe

जीवन एक गणित आहे, त्यात मित्रांना मिळवावे, शत्रुंना वजा करावे, सुखांना गुणावे, आणि दुःखांना भागावे, उरलेल्या बाकीत आनंदी जीवन जगावे…

Pratyek Divas Changlach Asto

प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही.. पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं…

Ek Sundar Vichar

लक्ष्मी म्हणते :- ‘जग पैशावर चालते पैसे नाहीतर काही नाही म्हणून मलाच किंमत’. विष्णु :- सिध्द करून दाखव. लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृष्य दाखवते. अंत्ययात्रा चाललेली असते, लक्ष्मी चालली असते, लक्ष्मी वरून पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक प्रेताला सोडुन पैसे जमा करायला धावतात. लक्ष्मी विष्णूला म्हणते की बघा बघितलं पैशाला किती किंमत आहे!! विष्णु :- प्रेत नाही उठले पैसे जमा करायला? लक्ष्मी :- प्रेत कसे उठणार तो मेलाय! विष्णूने खूप सुंदर उत्तर लक्ष्मीमातेला दिले :- ‘जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला हया जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी हया शरीरातून जाईन तेव्हा पैसा मातीमोलाचं…