Shabdatun Dukh Vyakt Karta Aale Aste Tar

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीच नसती… सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनांची किंमतच उरली नसती…

Gairsamaj Tala

गैरसमजूतीचा फक्त “एकच क्षण” खूप “धोकादायक” ठरू शकतो कारण, “काही मिनिटांमध्येच” आपण “एकत्र घालवलेल्या” “शंभर सुखाच्या क्षणाचा” “तो विसर पाडतो”….! म्हणून “गैरसमज टाळा” जर प्रत्येकाने आपला विचार करताना, दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर, नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही…

Pratyek Problemla Uttar Astech

आणि अगदी तसच म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला? – ते शेवटपर्यंत असणारच… पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं! या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो…

Ya 3 Lokana Kadhihi Visrayache Nahi

जीवनात तीन प्रकारच्या लोकांना, कधीही विसरायचं नाही… १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली.. २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी तुम्हाला सोडून पळ काढला.. आणि, ३) ज्यांनी तुम्हाला “अडचणीत” आणलं…