Funny New Year Wishes for Friends Marathi

इडा, पीडा टळू दे.. आणि नवीन वर्षात माझ्या भावांना, कडक आयटम मिळू दे… Happy New Year 2022! In Advance Love You भावांनो…

Navin Varshachya Lakh Lakh Shuhechha

*नमस्कार* बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.. एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच.. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे.. या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा.. आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या.. आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

New Year Advanced Wishes Marathi

नमस्कार! उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.. त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून, आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.. नवीन वर्ष २०२२ हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

San २०२२ Sathi Hardik Shubhechha

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..” सन २०२२ साठी हार्दीक शुभेच्छा..!