Category Archive: FUNNY SMS MARATHI

Rakhi Pornima Collage Joke

Rakhi Pornima Collage Joke FUNNY SMS MARATHI Image

एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन आली कॉलेज मध्ये.
अशी अन तशी प्रेझेंटी कमीच होती मुलांची,
त्यात उरलेले पसार झाले…
पण एक मुलगा (स्मार्ट) बसला होता कट्ट्यावर,
ती तिकडे गेली आणि म्हणाली हात दे, राखी बांधते,
तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही…
ती म्हणाली? काय झालंय काय?
हा म्हणतो, वा! गं वा! शहाणीच आहेस की,
मी उद्या मंगळसूत्र आणतो, तू घेशील का बांधून?

Mulga Mulgi Joke Marathi

Mulga Mulgi Joke Marathi FUNNY SMS MARATHI Image

मुलगा मुलीच्या घरी तिला ‘पाहायला’ गेला आहे,
(आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना ‘एकटे’ सोडतात)
मुलगी : तुम्ही काय करता?
मुलगा (मिश्किल स्वरात) : आंघोळ!!!!
(आता प्रश्न विचारण्याची त्याची पाळी. तो विचारतो…) तुम्हाला काय येतं?
मुलगी (मिश्कीलपणे): घाम!!!!
मुलगा (चपापतो, सावरतो) : अन, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का?
मुलगी : हो..
मुलगा : मग गाऊन दाखवा ना!
मुलगी : बाहेर वाळत घातलाय!!!!
मुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे!
(मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते,
आणि तो बेशुद्ध पडतो…

Congress Jhindabad Joke

Congress Jhindabad Joke FUNNY SMS MARATHI Image

एक गरीब माणूस मासा पकडून आणतो,
पण बायको त्याचे कालवण करू शकत नाही..
कारण,
घरात गॅस नाही, वीज नाही आणि ऑईल हि नाही..
मग हा माणूस माशाला नेऊन परत नदीत सोडतो,
तेव्हा मासा पाण्यातून वर येतो आणि ओरडतो,
काँग्रेस झिंदाबाद, पुन्हा एकदा ५ वर्षे…!

Page 20 of 67« First...10...192021...304050...Last »