अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर (मुहूर्त) हे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात. संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतांना पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर सुबक असे कापड ठेवून त्यावर नारळ आणि कलश तसेच घरातील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू आणि काही पैशांची नाणी ठेवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी घराची साफसफाई करण्यासाठी लागणारी केरसुणी ही नवीन विकत घेतली जाते. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिची हळद कुंकू लावून लक्ष्मीपूजनानंतर घरात वापरण्यास सुरुवात केली जाते.
Lakshmi Pujan Shubhechha Marathi
महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
Lakshmi Pujan Images Marathi
दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!