Lakshmi Pujan Wishes Greetings Quotes & Images in Marathi

अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. यावर्षी लक्ष्मी पूजन हे ४ नोव्हेंबर २०२२ रोजी आहे. या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी चंचल असल्यामुळे ती स्थिर व्हावी यासाठी स्थिर लग्नावर (मुहूर्त) हे लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात.

संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतांना पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर सुबक असे कापड ठेवून त्यावर नारळ आणि कलश तसेच घरातील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू आणि काही पैशांची नाणी ठेवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी घराची साफसफाई करण्यासाठी लागणारी केरसुणी ही नवीन विकत घेतली जाते. तिला लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिची हळद कुंकू लावून लक्ष्मीपूजनानंतर घरात वापरण्यास सुरुवात केली जाते.

ADVERTISEMENT

Laxmi Pujan Wishes in Marathi | लक्ष्मी पूजन शुभेच्छा मराठी

उंबरठा ओलांडून आज,
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

Lakshmi Pujan Shubhechha Marathi | लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!


Lakshmi Pujan Images Marathi | लक्ष्मी पूजन इमेजेस मराठी

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

Lakshmi Pujan Quotes in Marathi | लक्ष्मीपूजन कोट्स मराठी

रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे..
लक्ष्मीच्या पावलांनी,
घर सुख-समृद्धीने भरू दे..
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!


Laxmi Puja Quotes in Marathi | लक्ष्मी पूजा कोट्स मराठी

समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती,
दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती..
लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Laxmi Puja Wishes in Marathi | लक्ष्मी पूजा शुभेच्छा मराठी

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो..
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा…!


Laxmi Pooja Wishes Marathi | लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची..
धन-धान्यांच्या भरल्या राशी,
घरी नांदू दे सुख-समृद्धी..!
💥लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा..!💥


तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर,
सदैव कृपा राहो..
💥लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.💥


Caption for Laxmi Puja in Marathi

सुख आणि समृद्धी घेउनी,
आगमन व्हावे लक्ष्मीचे..
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे,
भविष्य उद्याचे..
✨लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨