Konitari Panyachya Mathala Vicharle

कोणीतरी पाण्याच्या माठाला विचारले की, बाबा तू इतका थंड कसा राहतो? माठाने अगदी मार्मिक उत्तर दिले: ज्याला माहित आहे की ज्याचा भूतकाळ माती व भविष्यकाळही मातीच आहे तो कशावर गर्व करणार? मानवाने सुद्धा जर हेच लक्षात ठेवले तर?

Jivnaat Changla Manus Honyasathi

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा… चुकलं तेव्हा माफी मागा, अन कोणी चुकलं तर त्याला माफ करा…

Itarana Aavdave Mhanun

इतरांना आवडावं म्हणून आपल्यात बदल करायची काय गरज आहे? आपण जसे आहोत तसेच आवडणारे कुणी ना कुणी नक्कीच भेटेल…

He Aayushya Punha Nahi

काय कालचक्र आहे बघा निसर्गाचे… १) लहान पण:- वेळ आहे, ताकद आहे पण पैसे नाही… २) तारुण्य:- ताकद आहे, पैसे आहे पण वेळ नाही… ३) म्हातार पण:- पैसे आहे, वेळ पण आहे पण ताकद नाही… निसर्गाला तोड नाही. म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा… हे आयुष्य पुन्हा नाही…