Category Archive: SPECIAL DAY SMS MARATHI

Jagtik Aarogya Dinachya Hardik Shubhechha

तेलात तळलेले सामोसे खाणे लोकांना आवडतं…
अशुद्ध पाण्याने भरलेली पाणीपुरी खातात…
फूटपाथ वर धूळ उडालेली पावभाजी खातात…
कोक आणि पेप्सीचे विष पैसे खर्च करून पोटात उतरवतात…
सिगारेट फुंकतात, तंबाखू आणि मावा खाऊन,
पिचकारी मारतात…
पण डॉक्टरांनी औषधे लिहून दिली की विचारतात,
साहेब काही Side Effect तर नाही ना?

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Chatrapati Shivaji Maharaj Punyatithi

पोरके झालो आम्ही…
पोरकी झाली स्वराज्यातील रयत…
किती रडली असेल ती रयत,
किती रडला असेल तो रायगड,
अरे आभाळाची ही छाती फाटली असेल.
विचारलं असेल त्यांनी एकमेकांना,
आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !!

महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस…
दि – ३ एप्रिल इ. स. १६८०.
हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे,
छत्रपती शिवाजी महाराजांचे
किल्ले रायगडावर निधन…
छत्रपतींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…

Jal Pratidnya – Jagtik Jal Din

२२ मार्च हा जागतिक जलदिन –
आज मी प्रतिज्ञा करतो की,
पाणी हे जीवन असुन,
त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन…
मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही,
नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व
पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.
पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन.
पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन…

जय हिंद! जय महाराष्ट्र!!
“पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती”

Page 1 of 16123...10...Last »