Bayko Khup Tras Dete

प्रत्येक जण म्हणतो बायको खूप त्रास देते, पण असे कोणीच म्हणत नाही कि, दुःखात फक्त तीच साथ देते!

Chuk Jhalyaas Maaf Kara

कधी चुक झाल्यास माफ करा पण, कधी माणुसकी कमी करु नका.. चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण “नाती” म्हणजे, आयुष्याचं “पुस्तक” आहे.. गरज पडली तर, चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका.. ‼ शुभ रात्री ‼

Tumchi Kimmat Tevha Hoil Jevha

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते, थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..! तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!

Mafi Magun Nati Japa

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा, माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर, माणसंच साथ देतात…!