Good Morning Marathi SMS

शुभ सकाळ! गुड मॉर्निंग!! जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!! स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते… सुप्रभात! आपला दिवस आनंदात जावो…! गुड मॉर्निंग मराठी SMS  

शुभ सकाळ | Shubh Sakal

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि, नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.. कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.. कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.. जन्म हा एका थेंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं.. पण मैत्री असते ती वर्तुळासारखी.. ज्याला कधीच शेवट नसतो… शुभ सकाळ! Shubh Sakal

Shubh Sakal Marathi Sandesh

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते अंतःकरणाची संपत्ती आहे.. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी, उपाशी मरत नाही… शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी संदेश

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा.. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा.. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा.. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा.. यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात… *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* Sundar Divsachya Shubhechha