Category Archive: FUNNY SMS MARATHI

Doctor & Garodar Bai Joke

एक गरोदर बाई डॉक्टर कडे जाते,
डॉक्टर तिला विचारतात कितवा महिना?
बाई म्हणते आठवा…
डॉक्टर म्हणतात, ईश्श्श मी कसा आठवु तुम्हीच सांगा…

Baykoche Aai Vadil Joke

बायको एक दिवस ऑफिसवरून थोडी लवकर घरी आली….
गुपचूप बेडरूम मध्ये येऊन बघते तर काय…
रजईच्या खालून २ पाय ऐवजी ४ पाय दिसताहेत…
तिचं डोकं एकदम सणकलं…
कोपऱ्यात माझी क्रिकेट Bat दिसली…
उचलून तिने जे झोडायला सुरुवात केली कि काही विचारू नका..
२-३ मिनिटानंतर दमली… मागे वळून किचनमध्ये आली…
बघते तर काय मी तिथे उभा… चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य…
हसू दाबत मी म्हणालो… अंग तुझे आई बाबा आले दुपारी…
त्यांना म्हटलं तुम्ही पडा थोडा वेळ… येईलच ती इतक्यात…

Rakhi Pornima Collage Joke

एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन आली कॉलेज मध्ये.
अशी अन तशी प्रेसेंटी कमीच होती मुलांची,
त्यात उरलेले पसार झाले…
पण एक मुलगा (स्मार्ट) बसला होता कट्ट्यावर,
ती तिकडे गेली आणि म्हणाली हाथ दे, राखी बांधते,
तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही…
ती म्हणाली? काय झालय काय?
हा म्हणतो, वा! ग वा! शहानीच आहेस की,
मी उद्या मंगळसूत्र आणतो, तू घेशील का बांधून?

Page 1 of 49123...102030...Last »