Majhya Maitriche Tula Ved Lagel

माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल…

Maitri Diwasachya Shubhechha

तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही एक वेगळेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची तुझी स्वतःची एक दृष्टी आहे, आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने ती मला लाभली, याहून मोठा आनंद तो कुठला…! मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!

Mitra Mhanje

मित्र म्हणजे, एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली, तुझ्या रूपाने…

Mi Asel Tujhyabarobar Nehmi

लांबचा पल्ला गाठतांना, दूर दूर जातांना, दुःख सारी खोडायला, नवे नाते जोडायला, ठेच लागता सावरायला, चुकीच्या वाटेवर आवरायला, मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच, तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…