रक्षाबंधन चारोळी

रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही सामावले बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे…

Marathi Rakshabandhan Status

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ताईला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

ताई खर सांगू का मी कधी तुझे रक्षण केले नाही तूच माझे रक्षण करत आली, माझ्यावर संकट येऊ नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली, राखीचे महत्त्व तूच जाणले तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले… ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

Raksha Bandhanachya Shubhechha Bhavakadun Bahinisathi

थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी एक बहीण असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!