Category: CHANAKYA NITI MARATHI

Patniche Prem Pativar Ki Tyachya Paishyavar

Patniche Prem Pativar Ki Tyachya Paishyavar CHANAKYA NITI MARATHI Image

लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो,
तो सर्व सुख-सुविधा प्रदान करतो तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते.
परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख-संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते…
या काळातच समजते की, पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर!

Je Lok Paishacha Jast Moh Kartat

Je Lok Paishacha Jast Moh Kartat CHANAKYA NITI MARATHI Image

जे लोक पैशाचा जास्त मोह करतात,
ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत…
या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो.
पाहिले पैसा कमावण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता.
पैसा जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरीला जाईल
याची नेहमी भीती वाटत राहते…

Jyancha Svabhav Jast Sadha-Saral Asto

Jyancha Svabhav Jast Sadha-Saral Asto Image

ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा,
जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो,
त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो…
धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.
अशा लोकांना दुर्बल समजले जाते.
अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते.