Aajicha Vadhdivas | Birthday Wishes for Grandmother

प्रिय आजी, अजुनही हवाहवासा वाटतो, तुझा मायेचा स्पर्श! अजुनही ऐकाव्याश्या वाटतात, तुझ्या राजा-राणीच्या गोष्टी.. अजुनही आठवतात, तुझी चांदोमामांची गाणी.. अजुनही हवीशी वाटते, तुझ्या मायेची कुस.. अजुनही हवासा वाटतो, तुझा आशीर्वाद आणि जगण्याला नवं बळ देणारी तू.. अजुनही… अजुनही… हविहवीशीच वाटतेस! परमेश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावं… हेच त्याच्याकडे मागणं!

60th, 61th Birthday Wishes Marathi

तुमच्या आयुष्याचा प्रवास या वळणावर आलेला असतांना, आठवतायत.. आजवर तुम्ही घेतलेले कष्ट, तुमची साधना, आणि जगण्यातून आमच्यापुढे तुम्ही ठेवलेला आदर्श.. इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो… हीच या वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छाही!

Aajobancha Vadhdivas | Birthday Wishes for Grandfather

तुमचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत.. या दोन्ही गोष्टींमुळे, तुमचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो! कुणाशीही, अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशीही, तुमची अगदी जिवलग मैत्री असते.. म्हणून तर, लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही सगळ्यांचेच लाडके असता.. परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं… हेच त्याच्याकडे मागणं!

Funny Birthday Wishes For Friend in Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते.. ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते.. मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! वाढदिवसाच्या आणखी गंमतीदार शुभेच्छा पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा = Funny Birthday Wishes in Marathi